Ketan Agrawal Death|लोहगड मृत्यू प्रकरणाला हत्येचं वळण, लोणावळा ग्रामीण पोलिसांचा धक्कादायक खुलासा

लोहगड दुर्घटनेबाबत मोठी बातमी समोर आलीय... केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी मोठा खुसाला झालाय.फोटो काढताना तोल जाऊन दरीत पडल्याने केतनचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला मानलं जात होतं. मात्र, ही दुर्घटना नसून हत्या असल्याचा प्राथमिक संशय लोणावळा ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या वेळी सोबत असलेल्या होणाऱ्या पत्नीनेच त्यांना मागून धक्का देऊन दरीत ढकलल्याचा संशय आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसंच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

संबंधित व्हिडीओ