हिंदू धर्मात घरवापसी केलेल्या सायली सुर्वे प्रकरणात पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय. ज्या सायलीनं तिचा नवरा आसिफ तासे आणि सासू गुलशन तासेविरोधात प्रचंड गंभीर आरोप केले होते.त्या सायली सुर्वेनं अचानक नवरा आणि सासूविरोधातले गुन्हे मागे घेतलेत.माझ्या चार मुलांचा विचार करुन मी ही केस मागे घेत असल्याचं सायलीनं म्हटलंय.सायलीनं आधी घरच्यांना विरोध करुन आसिफशी लग्न केलं. त्याच्याविरोधात तक्रार करुन गुन्हे दाखल केले. आणि आता आसिफला अटक होताच मात्र सायलीनं अचानक यू टर्न घेतलाय.काय आहे हे सगळं चक्रावून टाकणारं प्रकरण. पाहुया