महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी गोपाल बदने पोलिसांसमोर शरण आलाय. आज गोपाल बदनेला कोर्टात हजर केलं जाणार आहे.रात्री उशिरा बदनेची मेडिकल पूर्ण झाली.महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बदने फरार होता.दरम्यान या महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरुन सध्या राज्यात राजकारण सुरू झालंय.. आता बदनेला किती दिवसांची कोठडी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पीडित महिला डॉक्टरच्या वडिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे.. मी भेटायला गेलो त्यावेळी माझ्या अनोळखी असलेला धष्टपुष्ट माणूस भेटला.. तुम्ही मॅडमच्या वडील का?काही लागलं तर मला सांगा. असे मला विचारले होते तेवढ्यात माझ्या मुलीने बघितल. माझ्या हाताला धरून घेतलं बाजूला घेतलं. आणि कोणालाही असं बोलत जाऊ नका असं मुलीने सांगितलं होतं असं पिढी त्याच्या वडिलांनी सांगितलं.. त्यामुळे पीडितेच्या वडिलांना भेटणारा आणि काही लागलं तर सांगा म्हणणारा तो धष्टपुष्ट व्यक्ती कोण प्रश्न उपस्थित होत आहे. पीडितेचे वडील काय म्हणालेत पाहूया..