पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय.यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापलंय.. या निर्णयाने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात शाब्दिक चकमक सुरु झालीय.. आमच्या पक्षातील नगरसेवक घेऊन सत्तेत आल्याची' बोचरी टीका अण्णा बनसोडेंनी केली होती.याच टीकेला भाजपने २४ तासांच्या आत खरमरीत उत्तर दिले आहे. भाजपच्या नेत्या आमदार उमा खापरे यांनी टीका करणारे आमदार अण्णा बनसोडे यांना आत्मपरीक्षण करावं आणि ते स्वतः कुणामुळे निवडूण आले हे तपासावं, असा पलटवार केला आहे.