सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस अधिकारी गोपाळ बदने याला फलटण कोर्टात हजर करण्यात आले आहे. मृत डॉक्टरच्या सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदनेचे नाव असल्याने या प्रकरणी राज्यासह पुणे-सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. थोड्याच वेळात कोर्टात सुनावणी सुरू होणार असून, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.