येत्या तीन दिवसात राज ठाकरे कडून सुधारित आणि अद्यावत अहवाल शाखाध्यक्षांकडून मागवण्यात आलाय.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार योगेश कदम आणि कुणाल माईनकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.मतदार याद्या संदर्भात यादी प्रमुख गटप्रमुख शाखाप्रमुख यांच्यासोबत समन्वय साधण्याची जबाबदारी या तीन उपशहर अध्यक्षांवर आहे.मतदार यादी संदर्भातले घोळ, बोगस मतदारांची संख्या याबाबतचा अहवाल या तिघांनी राज ठाकरे यांच्याकडे सादर केला.