ज्या धारावीकरांची सर्वेक्षणाची प्रक्रिया अपुरी आहे, त्यांच्यासाठी राज्य सरकारने मोठी संधी दिली आहे! धारावी पुनर्विकास प्रकल्पात सर्व लाभार्थ्यांना सामावून घेण्यासाठी १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान 'दस्तावेज संकलन विशेष मोहीम' आयोजित करण्यात आली आहे. रहिवाशांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन सरकारने केले आहे. या मोहिमेसाठी धारावीमध्ये सेक्टरनिहाय तात्पुरती कार्यालये उभारली जाणार आहेत.