उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर यांच्यातील वाद मिटवण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. मात्र, धंगेकर यांनी शिंदेंच्या सूचनेनंतरही 'माझा लढा सुरूच राहील' अशी भूमिका घेतली. जैन मंदिर परत मिळेपर्यंत आपण माघार घेणार नाही, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले आहे.