पुण्यातील महायुतीच्या (भाजप) नेत्यांवर टीका केल्यामुळे धंगेकरांवर पक्षांतर्गत कारवाईची चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. मुख्यमंत्री या भेटीतून धंगेकरांना समज देणार की त्यांना पाठिंबा देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.