फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले. निंबाळकर मंचावर असतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना 'क्लीन चिट' दिली. मात्र, त्याचवेळी डॉक्टर भगिनीला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. दुसरीकडे राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला, तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.