लातूर जिल्ह्यातील निवळी गावातील चार जणांना सुखरुप वाचवण्यात आलंय. चार जण तावर्जा नदीपात्राच्या पाण्यात अडकलेत.. पोलीस प्रशासनाने त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं.. मात्र पोलिसांना कसोटीचा सामना करावा लागला एका अंपग व्यक्तीला वाचवण्यासाठी निवळी येथील 42 वर्षीय अंकुश महाडेकर हा अपंग व्यक्ती तावरजा नदीच्या पुरात अडकला होता. जीवाच्या आकांताने अंकुश याने प्रवाहात हाती लागलेल्या झाडाला घट्ट आवळून धरले होते पायाने अपंग असणारा अंकुश हतबल होऊन झाडाला पकडून थांबला होता पोलीस प्रशासनाने मानवी साखळी तयार करत पुराच्या पाण्यामधून अंकुश भाडेकर याला खांद्यावर उचलून घेऊन पुराच्या पाण्यातून बाहेर काढले पोलिसांच्या या धैर्याचे परिसरात कौतुक होत आहे तर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे