महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आहे. पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव आणि पुरवण्या मागण्या मांडल्या जातील. हे संपूर्ण अधिवेशन या सरकारसाठी खडतर ठरणार आहे. संतोष देशमुख हत्या, स्वारगेट बलात्कार प्रकरण आणि राज्यातील ढासळलेली कायदा-सुव्यस्था यावरुन सरकारला विरोधक घेरणार आहेत. याला सरकार कसं उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.