राज्यामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे. तर मुंबईला आज येलो अलर्ट देण्यात आला. काही ठिकाणी तुरळक पाऊस झालेला सुद्धा आहे. सकाळपासून मुंबईमध्ये रिमझिम पाऊस पडतोय. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांनाही येलो अलर्ट दिलेला आहे. तर पुणे, पुणे घाट परिसर, सातारा नाशिक यांनाही आज Orange अलर्ट देण्यात आलाय.