वडनेर भैरव परिसरामध्ये काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. शेतात झाकून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला. शेतामध्ये काढून प्लास्टिक पेपर मध्ये झाकून ठेवलेला कांदा सुद्धा भिजला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय.