Maharashtra Unseasonal Rain | सांगली, इंदापूर आणि बीडमध्ये कशी आहे अवकाळी पावसाची परिस्थिती?

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वायफळे येथे गारांचा पाऊस झाला.. दिवसभर उन्हाचा कडाका आणि सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं.. अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तासगाव तालुक्यामध्ये हजेरी लावली.. तर वायफळे परिसरामध्ये गारांचा पाऊस बरसला.. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.ऐन उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झालीय.. बीडच्या पाटोदा शहर आणि परिसराला सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः झोडपून काढले... वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने परिसरातील अनेक घरावरील पत्रे उडाले आहेत याबरोबरच अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली... तहसील कार्यालयाच्या आवारात विविध योजनांची माहिती देण्यासाठी उभारलेला जाहिरात फलक देखील या वादळी वाऱ्यामुळे कोसळला आहे... काही वेळ झालेल्या पावसामुळे प्रचंड उघड्यापासून मात्र पाटोदा करांची सुटका झाली...

संबंधित व्हिडीओ