साताऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट अवकाळी पावसाने हजेरी लावली.. दुपारी अचानकच सातारा शहरासह भागात ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली.. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळल्याचे चित्र पाहायला मिळालं.. वाढेफाटा चौकाचा ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळल्याने काही वेळासाठी या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.. जिल्हा शासकीय रूग्णालय परिसरातही झाडे उन्मळून पडली तर कोंडवे परिसरात 22 शेळ्या मेंढ्यावर विज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.