संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम पंढरपूरजवळ गेल्या तीन वर्षापासून रखडलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पालखी मार्गाची उद्या पुण्यापासून पाहणी करणार आहेत. यंदाही संतांच्या पालख्या पंढरपुरात पालखी मार्गावरून न जाता पालखी मार्गाच्या शेजारील अरुंद रस्त्यावरून जाणार आहेत. याच बाबत पंढरपूरच्या पालखी मार्गाच्या कामाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी.