विज्ञानाच्या युगात अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट असू शकतो, हे नागपूरच्या एका घटनेने समोर आलंय. नागपुरात 28 वर्षांच्या उच्चशिक्षित रिया गंधेवार या तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. मात्र, तिच्या निधनानंतर तिच्या आईने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केलेत. रियाला लग्नानंतर डिप्रेशनचा त्रास सुरू झाला होता. या आजारावर डॉक्टरांकडे उपचार करण्याऐवजी सासरच्या मंडळींनी एका स्वयंघोषित महाराजाचा रस्ता धरला. चामोर्शी जवळील हरणघाट येथील कार्तिक स्वामी महाराजांकडे रियाला 8 ते 10 दिवस जाऊन राहण्यासाठी सासरकडून दबाव टाकला जात होता, असा गंभीर दावा रियाची आई माधुरी पोतवार यांनी केलाय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी..