अजित पवारांची ओळख ही लोकनेते अशी होती... आणि पक्षातल्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना सांभाळण्याची उत्तम हातोटी अजित पवारांकडे होती.आता मात्र पार्थ पवारांचा पक्षात मनमानी कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीत ही धुसफूस वाढलेली असताना गेल्या 24 तासांत ३ महत्त्वाच्या घडामोडी घडल्यायत... पटेलांना आमच्या पक्षात असताना किंमत होती, असं सांगून शरद पवार गटानं चिमटा काढलाय..तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतलीय... तर याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी ५ मोठ्ठे आणि खळबळजनक दावे केलेत....