Ashok Kharat विरोधात SIT कडून 1150 पानांचे 2 आरोपपत्र दाखल, SIT कडे भक्कम पुरावे असल्याचा दावा

भोंदूबाबा अशोक खरात विरोधात SIT कडून चार्जशीट दाखल करण्यात आलंय.. खरात विरोधात पहिल्या 2 गुह्यांबाबत नाशिक न्यायालयात चार्जशीट दाखल झालंय. 17 मार्चला नाशिकच्या सरकारवाडा पोलिस स्टेशनला जादूटोणा आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.. त्यानंतर सर्व गुन्ह्यांचा तपास विशेष तपास पथक SIT कडे देण्यात आला होता.. याप्रकरणी SIT ने आतापर्यंत 105 साक्षीदारांची चौकशी केलीय... त्याचबरोबर सोशल मीडियातून आक्षेपार्ह व्हिडिओच्या 13 हजार 175 लिंक हटवण्यात आल्या आहेत... खरातविरोधात 750 आणि 450 पानांची असे एकूण 1150 पानांच्या दोन चार्जशीट दाखल करण्यात आल्या आहेत...आतापर्यंत नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात खरात विरोधात 17 गुन्हे दाखल आहेत...

संबंधित व्हिडीओ