एकीकडे मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे त्याचे परिणाम दिसायला सुरुवात झाली.वाशिममध्ये व्यावसायिक गॅस दरवाढीचा खाद्य व्यवसायावर परिणाम झालाय. हॉटेल, नाश्ता सेंटर, चहा टपरी आणि खानावळ व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या चार महिन्यांत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 1 हजार 380 रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापर्यंत 2 हजार 152 रुपयांना मिळणारा सिलिंडर मे महिन्यात 3 हजार 145 रुपयांना मिळतोय.. या संदर्भात हॉटेलमधून आढावा घेत हॉटेल मालक यांच्याशी बातचीत केलीय आमचे वाशिमचे प्रतिनिधी साजन धाबे यांनी.