पेरू देशात शॉपिंग मॉलचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली.पेरू देशातील ट्रजिलो शहरात रिअल प्लाजा शॉपिंग मॉलचे छत कोसळले.या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झालाय तर 78 जण जखमी झालेत. घटनेवेळी मोठ्या संख्येनं नागरिक मॉलमध्ये उपस्थित होते.छत कोसळताच एकच गोंधळ उडाला.. मॉलचे छत नेमके कसे कोसळले यासंदर्भात तपास सुरू आहे.