पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे एक हृदयद्रावक दुर्घटना घडलीय.. विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात पहाटे घरावर दरड कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.. ढगफुटीसदृश पावसानंतर डोंगरकड्याचा मोठा भाग कोसळून पाच घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. या दुर्घटनेत नंदू तिकोने, अनिता तिकोने आणि माऊली तिकोने यांचा मृत्यू झाला... गेल्या अनेक वर्षांपासून दरड प्रवण क्षेत्र घोषित केलेल्या पाटण गावाचे पुनर्वसन माळीन गावाच्या पुनर्वसनाच्या धर्तीवर करण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.