महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे टेस्लाची कार खरेदी करणारे भारतातील पहिले ग्राहक ठरले आहेत. 'मॉडेल वाय' खरेदी करत त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचा संदेश दिला. राज्य सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत असून, ते टोल माफीही देत असल्याचे त्यांनी सांगितले. ही कार ते नातवाला भेट देऊन तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करणार आहेत.