डोंबिवलीत एका घटनेने पती-पत्नीच्या नात्यातील वादाचे एक अत्यंत भयानक रूप समोर आले आहे. २००९ मध्ये ज्योतीचा संतोष पेटेकर याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पतीकडून संशय घेणे, मारहाण आणि छळ सुरू झाला. या सततच्या त्रासाला कंटाळून २०२० मध्ये जोती चार मुलांना घेऊन पतीपासून वेगळी राहू लागली आणि स्वतः कष्ट करून मुलांचा सांभाळ करत होती...सध्या न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असतानाही पतीने त्रास देणे सोडले नव्हते. संतोष हा हातात धारदार चाकू घेऊन जोतीच्या घरात घुसला आणि त्याने तिच्यावर थेट जीवघेणा हल्ला केला. मुलांच्या तत्परेतेमुळे आरोपीला बेड्या ठोकल्या गेल्या.
Kalyan Crime | Mother's life saved thanks to the quick action of four children; husband arrested for a life-threatening attack on his wife.