माजी महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त झाले होते. बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी नवीन महाव्यवस्थापकाची नियुक्ती तातडीने आवश्यक होती. आशिष शर्मा यांच्याकडे प्रशासनाचा मोठा अनुभव असून, त्यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.