देशाची आर्थिक राजधानी मुंबई दरवर्षी गणेशोत्सवाच्या उत्साहात न्हाऊन निघते. पण हाच उत्साह यंदा भारत पाकिस्तान बॉर्डरवर पाहायला मिळणार आहे. यंदा मुंबईतून बाप्पाची एक मूर्ती अनोख्या प्रवासाला निघाली आहे. 'भारत-पाक सीमेचा राजा' नावाची गणेशमूर्ती रविवारी मुंबईहून जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे, नियंत्रण रेषेजवळ रवाना झालीय. आपल्या कुटुंबांपासून दूर देशसेवा करणाऱ्या जवानांपर्यंत गणेशोत्सवाचा आनंद पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. हा उपक्रम सीमेवर तैनात सैनिकांचे मनोबल वाढवण्यास मदत करेल. देशरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या जवानांनाही बाप्पाच्या आगमनाचा उत्सव साजरा करता यावा, अशी भावना व्यक्ती केली जातेय..