मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टी पावसाळ्यानंतरच्या देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त सतरा ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे. ही धावपट्टी सतरा ऑक्टोबर, या दिवशी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच पर्यंत म्हणजे सहा तास तात्पुरती बंद असेल.