अमरनाथच्या स्वामीनगर परिसरात तामिळ भाषिक नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. त्यामुळे दरवर्षी नवरात्रोत्सवात दक्षिण भारतातील विविध मंदिर या ठिकाणी साकारली जातात. यंदा शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेलं कांचीपुरम इथलं कामाक्षी अम्मन हे मंदिर या ठिकाणी हुबेहुब साकारण्यात आलंय.