मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर कोंडी झाल्यानंतर ज्यांच्याकडून टोल वसूल करण्यात आला होता अशांना येत्या आठ दिवसात टोलचे पैसे परत करण्याचं आश्वासन IRB कंपनीने दिलं आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत खालापूर टोल नाका येथे झालेल्या बैठकीत हे आश्वासन देण्यात आलं आहे. यावेळी वाहतूक पोलीस अधिकारीही उपस्थित होते.मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर 3 फेब्रुवारी रोजी प्रोपलिन हा ज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे तब्बल 32 तास भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.अशा गंभीर परिस्थितीतही IRB कंपनीने प्रवाशांकडून टोल वसुली केल्याच्या निषेधार्थ MSRDC, IRB तसेच वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसमवेत खालापूर टोल नाका येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.