केंद्रीय भाजपने यंदाचे वर्ष प्रशिक्षण वर्ष म्हणून जाहीर केलंय. पक्षातील प्रत्येकाला प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. त्यासाठी देशभर महाअभियान राबविले जाणार असून, महाराष्ट्रात त्यासाठीची सुरुवात २० फेब्रुवारीपासून होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आणि महाराष्ट्राचे प्रभारी शिवप्रकाश हे या महाअभियानाचे राष्ट्रीय संयोजक असतील. गोवा, गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली, दीव-दमण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या पश्चिम क्षेत्रासाठीचे प्रभारी म्हणून गुजरातमधील माजी खासदार के. सी. पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'पंच प्रण' आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेले पंच परिवर्तन याची माहिती शिबिर परिसरात प्रदर्शित केली जाईल.