मुंबईत रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे.सकाळपासुन मुंबईत पावसाची रिपरिप सुरू असून मुंबईत ढगाळ वातावरण आहे. अनेक परिसरात अंधारमय स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या वाहतुकीवर सध्य स्थितीला या पावसाचा कोणताही परिणाम नाही.मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने इशारा दिला आहे. दुपारी २:४४ वाजता समुद्रात हाय टाईड सुमारे ४.३९ मिटर लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईकरांनी समुद्रात येणाऱ्या भरती वेळी समुद्रकिनारी न जाण्याचे प्रशासनानं आवाहन केलं आहे.