पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार १५ जूनपासून तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.कॅनडामध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होणे हा त्यांच्या या परदेश दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. त्याशिवाय सायप्रस आणि क्रोएशिया या देशांनाही ते भेट देणार आहेत.मोदी यांच्या दौऱ्याची सुरुवात सायप्रस भेटीने होणार आहे. ते कॅनडामध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेत सहभागी होतील..त्यांनंतर मोदी १६ आणि १७ जून रोजी परिषदेत सहभागी होतील.त्यापूर्वी १५ आणि १६ जून रोजी ते सायप्रसला असतील. जी-७ देशांचे नेते, इतर आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान या विषयांवर चर्चा होईल.