पावसाळा संपलाय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईतील प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा पर्यावरण विभाग कामाला लागलाय. नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा एकदा रस्ते धुण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पाच ते नऊ हजार लिटर क्षमतेचे टँकर हे भाड्याने घेण्यात येणार आहेत.