शिक्षण विभागात 'शालार्थ आयडी' आणि शिक्षक भरती घोटाळ्यांनंतर आता आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. राज्यातील हजारो शिक्षकांनी एकाच वेळी शाळेत नियमित नोकरी करत असतानाच पूर्णवेळ बी.एड. (B.Ed.) अभ्यासक्रम पूर्ण केल्याचा धक्कादायक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते हेमंत गांजरे यांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे.