Nandurbar| लक्कडकोट परिसरात 2 दिवसापासून वीजपुरवठा नाही, संपूर्ण गावाची पाण्याची मदार एकाच हातपंपावर

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये विजेचा लपंडाव कायमचा झालाय.एकीकडे विजेचा लपंडाव तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष यातच या भागातील महिलांना तासनतास वाया घालवावे लागत आहेत.डोंगराळ दुर्गम भागात हात पंप खराब असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून शहादा तालुक्यातील लक्कडकोट या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे.विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.गाव परिसरात असलेल्या पाच हातपंपांपैकी एकच हातपंप सुरू असल्याने महिलांना पाण्यासाठी तासतास बसून राहावे लागतंय.त्यामुळे डोंगराळ भागातील हातपंपांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

संबंधित व्हिडीओ