भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली. डोनल्ड ट्रम्प यांनी याची घोषणा केली. यावरुन ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्रावर निशाणा साधण्यात आलाय. भारताला शांततेची शिकवण देणाऱ्या ट्रम्प यांनी भारताचं सार्वभौमत्व विकत घेतलं का? नक्की काय सौदा झाला? असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय.