भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध छेडलं जाऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. असे असताना आता या दोन्ही देशांनी पुढे येत शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला थांबवत शस्त्रसंधी केली आहे. आज दोन्ही देशांच्या डिजीएमओंमध्ये अत्यंत महत्वाची चर्चा होणार आहे. या चर्चेत शस्त्रसंधीच्या अटी आणि इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे. त्यामुळे आज होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही चर्चा सकारात्मक ठरली तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध टळू शकते अन्यथा भविष्यात काहीही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.