Nandurbar| Petrol 112 रु, Gujarat मध्ये 103 रुपये; स्वस्त पेट्रोलसाठी नंदुरबारकरांची गुजरातला पसंती

नंदुरबार जिल्ह्यात आणि शेजारील गुजरात राज्यात पेट्रोलच्या दरात तब्बल 10 रुपयांचा फरक पाहायला मिळत आहे. नंदुरबारमध्ये आज पेट्रोल 112 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे, तर हाकेच्या अंतरावर असलेल्या गुजरातमध्ये हेच पेट्रोल 103 रुपयांना मिळते आहे. या फरकामुळे सीमावर्ती भागातील नागरिक गुजरातमध्ये जाऊन इंधन भरत आहेत.यामुळे नंदुरबारमधील पेट्रोल पंपचालकांचेही यामुळे नुकसान होत आहे. ग्राहक गुजरातकडे वळल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गुजरात राज्याप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोलवरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.थेट गुजरातच्या पेट्रोल पंपावरून परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत जव्हेरी यांनी.

संबंधित व्हिडीओ