नाशिकमध्ये कुंभपर्वाला सुरुवात झालेली असतानाच गोदावरी नदी प्रदूषणाचा मुद्दादेखील चांगलाच तापला आहे. गोदावरी प्रदूषणाच्या याचिकेबाबत थेट राज्याच्या मुख्य सचिवांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. या प्रतिज्ञापत्रात तब्बल 199 अधिकाऱ्यांच्या नावांचा समावेश केला आहे. गोदावरी नदी प्रदूषणाबाबत प्रशासन अजूनही गंभीर नसल्याचं बघायला मिळत असून पानवेलींमुळे गोदावरीचा श्वास कोंडला गेला आहे. गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी खर्च होणारे कोट्यवधी रुपये जातात तरी कुठे हा प्रश्न आता उपस्थित होतोय..