पुण्याच्या इंदापुरात तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कारभारावरून वाद पेटलाय. पण हा वाद राजकीय नेते विरुद्ध प्रशासन असा नाही.. तर जीवन बनसोडे यांच्या निलंबनासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादीच्या पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते भिडलेत.. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांचं निलंबन करावा या मागणीसाठी भाजप आणि इतर संघटनांनी इंदापुरात मोर्चा काढला.. यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्या विरोधात मोर्चा काढला. या वादाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी..