उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कारानं गौरव करण्यात आला.महाराष्ट्रातले ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार झाला.या सत्कार समारंभात दोघांनीही एकमेकांचं कौतुक केलं.काल हसत्या खेळत्या वातावारणात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.त्यानंतर ठाकरे गटाची आजची सकाळ उजाडली ती तीव्र नाराजीनं.पवारांनी शिंदेंचा केलेला सत्कार आणि कौतुक ठाकरेंना मुळीच रुचलेलं नाही.२०१९ पासून ठाकरे गट पवारांचं मार्गदर्शन घेतोय.पवारांच्या सल्ल्याप्रमाणे चालतोय. आज मात्र इतक्या वर्षांत पहिल्यांदाच ठाकरेंना पवारांचा राग आलाय आणि तो त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलाय.हा सगळा घटनाक्रम एवढाच राहात नाही.तर याचसंदर्भात पडद्यामागेही अनेक गोष्टी सुरू आहेत.पवारांनी केलेला शिंदेंचा सत्कार ठाकरेंना एवढा का झोंबला.