Nitesh Rane| दुकानदाराला हनुमान चालिसा म्हणायला लावा,नितेश राणेंचं पुन्हा बेताल वक्तव्य

सध्या अवघा देश पहलगाम हल्ल्याविरोधात एकवटला आहे.भारतातल्या मुस्लिम समाजानं या हल्ल्याला तीव्र निषेध केला. काश्मिरी मुस्लिमांनी महाराष्ट्रासह भारतातल्या पर्यटकांचा जीव वाचवल्याच्या घटनाही आपल्यासमोर आहेत. हल्ल्याच्या घटनेनं देश सुन्न असताना मंत्री नितेश राणेंच्या विषारी वक्तव्यानं पुन्हा एकदा वातावरण खराब होण्याची शक्यता आहे.ते धर्म विचारुन गोळ्या घालतात तर आपणही धर्म विचारुनच दुकानातून सामान विकत घ्या असं बाळबोध वक्तव्य नितेश राणेंनी केलंय.दुकानदाराला धर्म विचारा आणि हनुमान चालीसा म्हणायला लावा मगच सामान खरेदी करा, असं आवाहन नितेश राणेंनी हिंदूंना केलंय.सध्याच्या परिस्थितीत अवघा देश अतिरेक्यांविरोधात आणि पाकिस्तानविरोधात उभा आहे. असं असताना भडकाऊ वक्तव्य करुन माथी भडकवण्याचा प्रयत्न नितेश राणेंकडून केला जात असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी नितेश राणेंना दिलेली तंबी राणेंनी उडवून लावली की मुख्यमंत्र्यांचा त्यांच्या मंत्र्यांवर वचकच राहिलेला नाही असा सवाल उपस्थित होतोय.

संबंधित व्हिडीओ