ATM मधून पैसे काढताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.आर्थिक व्यवहारांसाठी आरबीआयने २ रुपयांची वाढ मंजूर केली. 1 मेपासून नवे दर लागू होणार आहेत. या बदलामुळं आता तुम्हाला प्रति कॅश विथड्रॉलवर 17 ऐवजी 19 रुपये शुल्क भरावे लागेल. मात्र, सध्या बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली येथील खातेधारक त्यांच्या बँकेच्या एटीएममध्ये दरमहा पाच आणि इतर बँकांच्या मशीनमध्ये तीन मोफत व्यवहार करू शकतात.