मुंबईगोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेली अनेक वर्ष रखडलंय. आणि असं असलं तरी आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन टप्प्याच्या ठेकेदारांना अजून मुदत वाढ हावी आहे. मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मार्च दोन हजार सव्वीस या मुदतीत काम पूर्ण करण्याची सक्त सूचना त्यांनी केली आहे.