पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे आपली वाटचाल सुरू केली आहे.. उजनी धरणातील सुमारे एक लाख 25 हजार तर वीर धरणातील 7 हजार क्युसेक विसर्गामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर नदीकाठच्या घरात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. याचबाबत भीमा नदीच्या काठावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...