पूरामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुराव्याचं संकट आहे... कारण बँकेच्या पडताळणीनंतर शेतकऱ्यांना मदत देण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत... मदत मिळवायची असेल तर शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे... आता ज्यांचा संसारच वाहून गेला ते पूरग्रस्त केवायसी करण्यासाठी कागदपत्रं आणणार कुठून असा प्रश्न आहे.. तर दुसरीकडे तातडीच्या मदतीमध्ये पुरग्रस्तांना तीन किली तूरडाळ देण्याचेही आदेश आहेत, मात्र जिल्हा पुरवठा विभागात सध्या काय उपलब्ध नाही... तर अनेक दिवस गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झालाय.. अशा अनेक समस्यांनी शेतकरी संकटात सापडलाय..