Global News | PM Modi तीन दिवसीय मनिला दौऱ्यावर, मनिलामध्ये भारत-आसियान शिखर परिषद

फिलीपाईन्सची राजधानी मनिलामध्ये सध्या महत्त्वाची जागतिक परिषद सुरु आहे आणि त्याच परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मनिलामध्ये आज दाखल झाले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. दक्षिण आशियाई संघटना आसियानची ४९वी शिखर परिषद मनिलामध्ये सुरु झालीय.त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारत-आसियान शिखर परिषदेसाठी मनिलामध्ये गेले आहेत. हा त्यांचा तीन दिवसीय दौरा आहे. या दरम्यान ते क्वाड संघटनेच्या सदस्य राष्ट्र प्रमुखांचीही भेट घेणार आहेत.मंगळवारी म्हणजे उद्या अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प हे देखील मनिलामध्ये येत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांचीही पुन्हा भेट होणार आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांनंतर ट्रम्प यांच्या या आंतरराष्ट्रीय दौऱ्याकडेही जगाचं लक्ष आहे.

संबंधित व्हिडीओ