Global News | कुलगाममध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश, चकमकीदरम्यान लश्कर ए तैयबाचा दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा यंत्रणांना एक मोठं यश हाती आलंय. कुलगाममध्ये सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाई दरम्यान झालेल्या चकमकीत लष्कर ए तैयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी लतीफ अहमद भट मारला गेलाय. देवसरच्या जंगलपोरा परिसरातील एका मशिदीत तो लपून बसला होता. सुरक्षा यंत्रणांनी त्याला शरणागतीचं आवाहन केलं, त्यासाठी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवादही साधला. मात्र त्यानं शरणागतीला नकार देत पोलिसांवरच गोळीबार सुरु ठेवला. अखेर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात लतीफ अहमद भट ठार झालाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या ऑपरेशनबाबत एक्सवरून पोस्ट करत माहिती दिली.

संबंधित व्हिडीओ