मुंबई-पुणे कनेक्टींग लिंकवर दरड कोसळल्याच्या घटनेनंतर आता बातमी आहे समृद्धी महामार्गाची... पहिल्या जोरदार पावसामुळे समृद्धी महामार्गावर देखील आता खड्डे पडल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरहून नाशिक कडे जाताना वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर अनेक पूलांवर खड्डे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे वाहनधारकांना खड्डे असल्याचे अंदाज देखील येत नाहीये. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.